सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर
सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर
( जन्म:- १२ डिसेंबर १९१२)
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर या दांपत्याचे प्रथम अपत्य म्हणजे यशवंतराव. १२ डिसेंबर १९१२ .रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यावेळी बाबासाहेब बी.आय.टी. चाळ, दुसरा मजला खोली क्रमांक ४९ मध्ये राहत असत. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याचे यशवंतराव एकुलते एक सुपुत्र होते. त्यांना सारा समाज 'भय्यासाहेब'
म्हणायचा. 'भय्यासाहेब' एकच आणि ते म्हणजे
यशवंतराव भीमराव आंबेडकर!
ह्या सूर्यपुत्राने आंबेडकरी समाज एकसंध ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. विविध गटात विखुरलेल्या नेत्यांना एकत्र आणण्याचे काम केले. बौद्ध म्हणूनच नोंद करावी, यासाठी जिवाचा आटापिटा केला. बौध्दांना सवलती मिळाल्या पाहिजे, असा आग्रह धरला. आपल्या नाजूक प्रकृतीची तमा न बाळगता खेड्यापाड्यात सातत्याने फिरत राहिले. ते जिथे जिथे जायचे लोक त्यांना बाबासाहेबांचे सुपुत्र म्हणून बघायचे.
पत्रकार, धम्माचा प्रचार-प्रसार करणारे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष, अंधश्रध्देला विरोध करणारे, ऐक्य टिकविण्यासाठी धडपड करणारे, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौध्दांना सवलती मिळवून देणारे सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या १०५ व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम...
जय भीम!
नमो बुध्दाय!!
जय रिपब्लिक इंडिया !!!

Comments
Post a Comment